राज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं

राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय. 

Updated: Nov 14, 2014, 11:15 PM IST
राज्यात डेंग्यू थैमान, गडचिरोलीत मलेरियानं गाठलं title=

 गडचिरोली : राज्यात डेंग्यू प्रचंड प्रमाणात थैमान घालत असताना, गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय. 

विशेषतः लहान मुलांमध्ये मलेरियाचं प्रमाण जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसांत जवळपास शंभर जणांना मलेरियाची लागण झालीय. मच्छरदाण्या डेल्टामेट्रिल या औषधामध्ये बुडवून लावायच्या असतात. पण धक्कादायक बाब म्हणजे डेल्टामेट्रील हे औषधच गडचिरोलीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. 

पुण्यातून याबाबतचं टेंडर काढलं जातं, मात्र यावर्षी हे टेंडरच निघाल नाही त्यामुळे राज्यभरात हे जरूरी औषध उपलब्ध नाही अशी धक्कादायक माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी दिली आहे. 

त्याचप्रमाणे मलेरियाचं निदान करण्यासाठी RDK म्हणजेच रॅपिड डायग्नोस्टिक किट असणं आवश्यक आहे. तेही आरोग्यविभागाकडे उपलब्ध नाही. गडचिरोलीसारख्या आदिवासी दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेचं अक्षम्य दुर्लक्ष होतंय.    

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.