नागपूर : सरकार आणि विरोधक आपापपल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेलाय.
अधिक वाचा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे नागपुरात आंदोलन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर विरोधकांची आक्रमक भूमिका अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही कायम होती. काँग्रेसनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर पुन्हा आंदोलन केलं. शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
अधिक वाचा : शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांसह भाजपची केली कोंडी
'मन की बात' नको तर 'काम की बात' करा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला लगावला. यावेळी सरकारचा निषेध करत विरोधकांनी सलग चौथ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.