चोरांचा मंदिर पेटीवर डल्ला, सीसीटीव्हीत कैद

शहरात घरफोडीचं सत्र सुरु आहे. कानसई गावदेवी मंदिरात चोरी करतांना दोन घरफोडे CCTVमध्ये कैद झालेत. 

Updated: Jan 22, 2016, 03:40 PM IST
चोरांचा मंदिर पेटीवर डल्ला, सीसीटीव्हीत कैद title=

अंबरनाथ : शहरात घरफोडीचं सत्र सुरु आहे. कानसई गावदेवी मंदिरात चोरी करतांना दोन घरफोडे CCTVमध्ये कैद झालेत. 

या मंदिरात दोन चोरांनी प्रवेश करून मंदिरातील देवीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम चोरली.लोखंडी सळईच्या साहाय्यानं त्यांनी दानपेटी फोडून रक्कम काढून पोबारा केला. 

हा चोरीचा  सगळा प्रकार CCTV कॅमे-यात कैद झाला. विशेष म्हणजे अंबरनाथच्या याच कानसई परिसरात शुक्रवारीच दोन घरफोड्या देखील झाल्यात. गेल्या तीन दिवसांत पाच घरफोडया झाल्या आहेत. 

या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र, या घटनांना आळा घालण्यात पोलिस प्रशासन कमी पडतंय.