बोगस काम तर मग विसरा दाम!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे. 

Updated: May 27, 2015, 09:42 PM IST
बोगस काम तर मग विसरा दाम! title=

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे. 

दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा खरं तर विकासकामांची पर्वणीच ठरतोय. कुंभमेळा तोंडावर आल्याने कामं उरकण्याचा सपाटा सध्या यंत्रणांमार्फत सुरू आहे. त्यामुळेच अनेक कामांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी शहरात सुरू असणाऱ्या कामांची मेरी, अभियांत्रिकी विद्यालय किंवा शासनाच्या इतर त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. निकृष्ट काम करणाऱ्यांना दणका देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक मनपाचे आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलीय.

गुणवत्ता टिकवण्यासाठी सुरू असणाऱ्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाला उशीर झाल्याचं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पा. भा. करंजकर यांनी व्यक्त केलंय. 

कामांत हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, याबाबत कोणाचंच दुमत नाही. मात्र ज्या उत्सवासाठी हजारो कोटी रूपये खर्च केला जातोय त्या उत्सवाच्या काळातच निकृष्ट दर्जाचं काम होणार असेल तर चौकशा आणि कारवाईचा उपयोग काय असा सवाल उपस्थित होतोय. लवकरात लवकर या कामांची दखल घेऊन सुधारणा करण्याची मागणी केली जातेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.