हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे

 हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2017, 03:17 PM IST
 हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे title=

नाशिक : हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय. कांदा सडून जात असल्यानं येवल्यातल्या नगरसूलमधल्या शेतक-यानं कांदा पेटवून दिला. त्या शेतक-याची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. 

 हे फेकू सरकार शेतकऱ्याचे डोळे पुसायला येत नाही, तर या सरकारची भूमिका शेतकऱ्यांचा अपमान करण्याचीच आहे, असं त्या म्हणाल्या. कांद्यांचे भाव गडगडल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा शेतातच जाळून टाकला आहे. कारण हा कांदा काढणीचा भाव, म्हणजे बाजारात पोहोचवण्या इतका पैसा देखील कांदा विकून निघणार नाही.