औरंगाबाद : मध्यरात्री पुरूषातील लांडगा जागृत होतो, असा लांडगा औरंगाबादेत जागा झाला आणि रस्त्यावर चालणारी महिला आपली प्रॉपर्टी असल्याचे समजून त्याने तिचा पाठलाग करून कट मारला. पण ही महिला निघाली पोलिस कॉन्स्टेबल... मग काय त्या लांडग्याला पोलिसांनी बेदम धुतले.
मुस्तकीन कुरेशी ऊर्फ मुज्जफ्फर (रा. सिल्लेखाना) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार पोलिस आयुक्तांच्या कानावर पडताच त्यांनी युवकाची दुचाकी खराब होईपर्यंत पोलिसांनी ताब्यात ठेवावी, असे सक्त आदेश दिले.
क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारच्या रात्री पोलिस नियंत्रण कक्षातील चार महिला पोलिस कर्मचारी पीसीआर व्हॅनसह गस्तीवर होत्या. दोन वाजेच्या सुमारास बुलेट दुचाकीस्वार मुस्तकीनने सिल्लेखाना, पैठण गेट, निराला बाजार, औरंगपुरापर्यंत महिला पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत वाहनाला कट मारून पुढे निघून गेला.
हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु दुचाकी वळवून तो पुन्हा सिल्लेखान्यातील गल्लीबोळात शिरला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक टिपून घडला प्रकार नियंत्रण कक्षाला कळवला. उपनिरीक्षक कुरुंदकर यांनी शोध घेऊन मुस्तकीनला ताब्यात घेतले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई करून सोडून दिले.