ट्रेकर्सला लागले 'के टू एस'चे वेध!

पावसाळ्याच्या मध्यावर वेध लागतात ते केटूएस म्हणजे कात्रज ते सिंहगड या अनोख्या ट्रेकचे.. यंदा 31 जुलैला हा ट्रेक होणार आहे. त्यासाठी स्पर्धकांची तयारी जोरात सुरू आहे. 

Updated: Jul 25, 2015, 07:26 PM IST
ट्रेकर्सला लागले 'के टू एस'चे वेध! title=

पुणे : पावसाळ्याच्या मध्यावर वेध लागतात ते केटूएस म्हणजे कात्रज ते सिंहगड या अनोख्या ट्रेकचे.. यंदा 31 जुलैला हा ट्रेक होणार आहे. त्यासाठी स्पर्धकांची तयारी जोरात सुरू आहे. 

पावसाळा सुरू झाला की पुणेकरांना वेध लागतात केटूएसचे.. ट्रेकींगची प्रचंड आवड, कोणत्याही संकाटाशी दोन हात करण्याची खुमखुमी ज्यांच्यात आहे अशांसाठी हा ट्रेक विशेष.. त्यासाठीचा जोरदार सराव सुरू झालाय. 

रात्रीचा भयानक अंधार, त्यात वरनं कोसळणारा धो धो पाऊस अशा वातावरणातला 13 टेकड्या पार करण्यासाठी सहभागी स्पर्धक उत्सुक आहेत.  

साहस आणि क्षमतेची कसोटी पाहणारा हा ट्रेक.. नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे गेली 13 वर्ष ही स्पर्धा आयोजीत केली जाते. 3 स्पर्धकांची मिळून एक टीम असते. अलीकडच्या काळात मुलींचा सहभाग स्पर्धेत वाढलाय. 

गेल्या वर्षी अशा 300 टीम्स केटूएसमध्ये सहभागी झाल्या. यावर्षी हा आकडा साडेतीनशेच्या वर जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कॅटेगरीतल्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिकंही आहेत. पण पारितोषिकांसाठी नाही तर यातल्या थरारासाठी टीम्स यात सहभागी होतात. रविवारपर्यंत नोंदणीची संधी आहे. त्यामुळे संधी सोडू नका... झी 24 तासही तुमच्या सोबत आहे... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.