धक्कादायक ! पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न, चौघांना अटक

पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी  ३ महिला आणि एकाला पोलिसांनी अटक आहे.

Updated: Jan 6, 2017, 11:52 PM IST
धक्कादायक ! पुण्यात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न, चौघांना अटक title=

पुणे : शहरात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी  ३ महिला आणि एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. या बाळाची विक्री ३ लाख रुपयांत करण्यात येणार होती. हे बाळ केवळ एक महिन्यांचे आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीप्ती खरात ( खडकवासला, पुणे) लतिका पाटील (डोंबिवली, ठाणे), आशा अहिरे ( उल्हासनगर) केशव धेंडे ( महंमदवाडी, पुणे) यांना  फरासखाना पोलिसांनी अटक  केली आहे. पोलिसांसडून अधिक तपास सुरु आहे.