मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार

जिल्ह्यात काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. रस्त्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 16, 2017, 11:38 AM IST
मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार  title=

औरंगाबाद, नांदेड : जिल्ह्यात काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. रस्त्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

नांदेडमधील उमरी तालुक्यातील 5 गावात सकाळपासून मतदान करण्यात आलेले नाही. एकाच रस्त्यावरील 5 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. मुख्य रस्त्याच्या मागणीसाठी बहिष्कार घालण्यात आला आहे. बितनाळ, बोथी, तुराटी, मोखंडी आणि सावरगावमध्ये मतदान नाही 

तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरच्या ग्रामस्थांचा मतदानवर बहिष्कार घातला आहे. गावाला रास्ता नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. या ठिकाणीही मतदान करण्यात आलेले नाही.