नाशिकमध्ये आणखी दोन घोटाळे उघड

राज्यात सध्या घोटाळ्याचं पेव फुटलंय. नाशिकमध्ये उघडकीस झालेल्या कोट्यवधींच्या केबीसी घोटाळ्यानंतर आणखी दोन घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यात औरंगाबादमध्ये सुपर पॉवर घोटाळा उघडकीस आलाय. यातही राज्यासह इतर राज्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालय.

Updated: Jul 28, 2014, 09:47 PM IST
नाशिकमध्ये आणखी दोन घोटाळे उघड title=

नाशिक : राज्यात सध्या घोटाळ्याचं पेव फुटलंय. नाशिकमध्ये उघडकीस झालेल्या कोट्यवधींच्या केबीसी घोटाळ्यानंतर आणखी दोन घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यात औरंगाबादमध्ये सुपर पॉवर घोटाळा उघडकीस आलाय. यातही राज्यासह इतर राज्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालय.

तर नागपुरत वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली जनतेची कोट्यवधींची फसवणूक करणा-या तिघांनाही गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळालय.

जनतेच्या कष्टाच्या पैशांची अशी लुबाडणूक करणा-या घोटाळेबहाद्दरांवर सरकारनं कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होतेय. तर दुसरीकडे गुंतवणूक करतानाही आपण सर्वांनीच याचं भान बाळगण्याचीही आवश्यकता निर्माण झालीय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.