बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.

Updated: Sep 24, 2016, 11:46 PM IST
बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत title=

बीड : जोरदार बरसणारा पाऊस आणि दुथडी भरुन वाहणारे नदीनाले पाहिले की कोणालाही त्यात मनमुराद भिजण्याचा मोह होतोच. मात्र हा मोहच घातक ठरु शकतो. याचंच उदाहरण बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर पाहायला मिळाले. सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.

मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण ओसंडून वाहू लागले आहे. उसळून वाहणा-या बिंदुसरा धरणक्षेत्रात दोन उत्साही तरुण उतरले. पाण्याच्या त्या वेगवान प्रवाहात सेल्फी काढण्याचा अट्टाहास ते करत होते. मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहात त्यांचं हे फाजील धाडस त्यांच्याच अंगलट आलं. आणि त्या दोन तरुणांपैकी शेख कादीर शेख अख्तर याचा पुरात वाहून मृत्यू झाला. तर त्याच्या दुस-या साथीदाराला वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वत्र धोधो पाऊस झाल्यानं, नद्यानाले  दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तर काही नद्यांना पूर आलेला आहे. मात्र पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकरीवर्गात जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. तर उजनी धरणाची पाण्याची पातळीही मुसळधार पावसामुळे शंभर टक्क्यांकडे वाटचाल करत आहे.