दोन नराधम शिक्षकांनी केला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

नांदेड जिल्ह्यात आश्रमशाळेतील एका 11 वर्षाच्या मुलीवर शाळेतीलच दोन शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.. 

Updated: Jan 13, 2016, 07:50 PM IST
दोन नराधम शिक्षकांनी केला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार  title=

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आश्रमशाळेतील एका 11 वर्षाच्या मुलीवर शाळेतीलच दोन शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.. 

हदगाव तालुक्यातील चाभरा तांडा इथल्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित थावरा नाईक प्राथमिक आश्रम शाळेतील ही घटना आहे. 11 आणि 17 डिसेंबरच्या रात्री या दोन  नराधम शिक्षकांनी मुख्यध्यापकांच्या कार्यालयात नेऊन या मुलीवर बलात्कार केला.

 

एका महिन्यानंतर पीडित मुलीची आई तिला भेटण्यासाठी शाळेत आल्यावर या मुलीने घडलेला प्रकार सांगितला.. बालाजी ईबीतदार आणि शीवानंद डांगे  अशी या नराधम शिक्षकांची नावं आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे दोन शिक्षक फरार आहेत. मात्र या घटनेनंतर या आश्रमशाळेतील अनेक समस्या पुढे आल्या आहेत. 

मुलींची निवासी आश्रम शाळा असूनदेखील या वसतीगृहात एकही महिला कर्मचारी कार्यरत नाहीये, शिवाय शाळेतील गैरकारभाराबाबत वाच्यता करायची नाही अशा धमक्यादेखील विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्याचा गावक-यांचा आरोप आहे. आता पोलिस या दोन फरार शिक्षकांच्या शोधात आहेत.