सांगली : सांगली शहर शुक्रवारी संध्याकाळी डबल मर्डरने हादरुन गेले. रामनगर परिसरात दोन तरुणांची संध्याकाळच्या सुमारास हत्या करण्यात आलीय. तर एक जण गंभीर जखमी झालाय.
धनवान उर्फ विकी टिंगरे आणि राहुल उर्फ बंड्यागोल अशी मृतांची नावे आहेत. तर जखमी हरिश शिंदेवर उपचार सुरूयत. तीन ते चार जणांनी हल्ला केला आणि ते फरार झाले.
दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून हे खून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सांगली पोलीस करतायत.