उद्धव ठाकरे कल्याण- डोंबिवलीला जाणार

 कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण येथे जाणार आहे. 

Updated: Nov 2, 2015, 02:39 PM IST
उद्धव ठाकरे कल्याण- डोंबिवलीला जाणार  title=

 मुंबई :  कल्याण डोंबिवलीत एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असलेल्या शिवसेनेनेच्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कल्याण येथे जाणार आहे. 
 
 कल्याणच्या दुर्गाडी टेकडीवर दुर्गा देवीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  विजयाचा गुलाल घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
 तसेच डोबिवलीला फडके रोडवरील गणपती मंदिरातही दर्शनासाठी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.   
  
शिवसेनाभवनाजवळ शिवसैनिकांची गर्दी 
कल्याण डोंबिवलीत शिवसेना एक हाती सत्ता मिळविल्याच्या वाटेवर असल्याने  शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ गर्दी करत आहे. 
 
 कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढत होत. या निवडणुकीत शिवसेनेने आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 63 जागांवर आघाडी घेतली असून एक हाती सत्ता मिळविण्याच्या मार्गावर आहे. 
 
 आतापर्यंत शिवसेनेने 50 जागांवर विजय मिळविला आहे. तर 13 जागांवर आघाडी मिळवली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.