उद्धव ठाकरेंचा एमआयएम आणि शरद पवारांवर हल्लाबोल

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. आज औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि एमआयएमच्या ओवेसी बंधूंवर सडकून टीका केलीय. 

Updated: Apr 19, 2015, 09:38 PM IST
उद्धव ठाकरेंचा एमआयएम आणि शरद पवारांवर हल्लाबोल title=

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. आज औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि एमआयएमच्या ओवेसी बंधूंवर सडकून टीका केलीय. 

एमआयएमनं मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवली झालं ना डिपॉझिट जप्त, असं म्हणत एमआयएमचा बुडबूडा फुटणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. तसंच एमआयएमचा इतिहास काय आहे, त्यांची पार्श्वभूमी कोणती ते तपासण्यासाठी गुगल सर्च करा, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

विकासाच्या मुद्यावर चर्चा करायला हवी असं म्हणत त्यांनी औरंगाबादच्या प्रश्नांना विसरणार नसल्याचं सांगितलं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच तसंच हे शहर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असल्याचं ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. 

फुटिरतावाद्यांना मत म्हणजे एमआयएमला मत असं म्हणतं ठाकरेंनी सेना - भाजपाच्या निशाणीवर शिक्का मारण्याचं भावनिक आवाहन त्यांनी जनतेला केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.