राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2017, 04:51 PM IST
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता title=

मुंबई : राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या 24 तासात गारपीट होईल, असे हवामान खात्याने वर्तविले आहे.

सांगली जिल्ह्यात अवकाळीपावसासह गारपीट झाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या गारपीटीनं परिसरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय.

सांगलीतील पारा 40 अंशांवर गेला असला तरी या पावसानं हवेत काहीसा गारवा निर्माण झालाय.