पिंपरी चिंचवडमध्ये नववर्षातही वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी चिंचवड मध्ये जुन वर्ष वाहन तोडफोड आणि जाळपोळीन गाजल होते. मात्र नव्या वर्षातही पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरु असून पहाटे तीनच्या सुमारास तिघांनी लाकडी दांडक्याने तापकिरनगर, काळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 09:34 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये नववर्षातही वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच  title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये जुन वर्ष वाहन तोडफोड आणि जाळपोळीन गाजल होते. मात्र नव्या वर्षातही पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरु असून पहाटे तीनच्या सुमारास तिघांनी लाकडी दांडक्याने तापकिरनगर, काळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केली.

महापालिका निवडणूक लढवू इच्छिणा-याचा फलक फाडल्यामुळे वाहनांची तोडफोड केल्याच समोर येतेय... याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघाना अटक केलीय..

काळेवाडी, तापकीर चौक मध्ये नागरिकांनी राहत्या घरासमोर वाहने पार्क केली होती. मध्यरात्री अडीचच्या सुमारास  तिघांनी लाकडी दांडक्यान वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी अशा 16 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.