औरंगाबाद : औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असणाऱ्या स्थळांपैंकी 'वेरुळ' बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... कदाचित या ठिकाणीला तुम्ही भेटही दिली असेल पण, या गुफांखाली वसलेल्या एका अज्ञात शहराची ओळख तुम्हाला या व्हिडिओतून होईल.
राष्ट्रकूट वंशाच्या शासकांनी बनवलेल्या या गुफा युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केल्यात. इथल्या गुफा पाचव्या आणि दहाव्या शतकात बनवण्यात आल्यात. इथं, १२ बौद्ध गुफा, १७ हिंदू गुंफा आणि ५ जैन गुंफा आहेत. आजुबाजुलाच असलेल्या या गुंफा धार्मिक सौहार्द दाखवतात.