ग्रामस्थांनी मुलगी पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना डांबले

कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न शुक्रवारी दुपारी झाला. यातील ३ आरोपींना ग्रामस्थांना पकडण्यात यश आलं आहे. आरोपींना नेण्यासाठी आलेले पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे आरोपींसह पोलिसांनाही ग्रामस्थांनी डांबून ठेवले होते.

Updated: Jul 29, 2016, 10:06 PM IST
ग्रामस्थांनी  मुलगी पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना डांबले title=

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न शुक्रवारी दुपारी झाला. यातील ३ आरोपींना ग्रामस्थांना पकडण्यात यश आलं आहे. आरोपींना नेण्यासाठी आलेले पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे आरोपींसह पोलिसांनाही ग्रामस्थांनी डांबून ठेवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भांबोरा ते दुधवडी रस्त्यावर शाळेतली मुलगी घरी जात असताना ५ तरुणांनी तिला अडविले. या मुलीला उसाच्या शेतात नेले जात होते,  तिने आरडाओरडा केला. मुलीच्या चुलतभावाला तिचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यानेही आरडाओरडा केला. वस्ती जवळच असल्याने लगेच ग्रामस्थ जमा झाले, त्यांनी ५ तरुणांपैकी तिघांना पकडले आहे.

या आरोपींना भांबोरा गावात ग्रामपंचायतीत ठेवण्यात आले. पोलिसांना ही माहिती कळविल्यानंतर दोन पोलीस व एक होमगार्ड आला. मात्र, पोलीसच दारु पिलेले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने या सर्वांना गावाने डांबून ठेवले होते.