केवळ ९८ तासांत 'ती'नं गाठलं कन्याकुमारी ते लेह!

देशाची दोन टोके असलेली लेह आणि कन्याकुमारी हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटरच आहे. मात्र, चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केलंय पुण्यातल्या विनया केत यांनी...

Updated: Aug 4, 2016, 02:59 PM IST
केवळ ९८ तासांत 'ती'नं गाठलं कन्याकुमारी ते लेह! title=

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : देशाची दोन टोके असलेली लेह आणि कन्याकुमारी हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटरच आहे. मात्र, चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केलंय पुण्यातल्या विनया केत यांनी...

पर्यावरण संवर्धन आणि महिला सबलीकरणाला प्रेरणा देण्यासाठी त्यांनी ही मोहीम आखली आणि यशस्वीही केली. त्याची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद झालीय.

आव्हानात्मक प्रवास... 

लेह मधील नागमोडी वळण, खडतर रस्ते आणि गोठवणारं वातावरण अश्या स्तिथीत पुण्याच्या विनया केत यांनी लेह ते कन्याकुमारी हे अंतर पार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला... तो ही पर्यावरण संवर्धन आणि महिला सबलीकरण एक चांगला संदेश घेऊन!

विनया यांनी २५ जून २०१६ ला हा प्रवास सुरु केला... आणि पहिल्याच दिवशी त्यांनी तब्बल एक हजार २७५ किलोमीटर अंतर पार केलं... २९ जून २०१६ ला चार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत त्यांनी कन्याकुमारीपर्यंतच अंतर पूर्ण केलं! विनया केत या गेली सात आठ वर्ष चार चाकी गाडी चालवतात! त्याच पार्श्वभूमीवर त्यांना 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्वत:चं नाव यावं असं स्वप्न पाहिलं... आणि त्याच स्वप्नासाठी त्यांनी लेह ते कन्याकुमारी हे अंतर पार केलं!
 
पण हा प्रवास करताना विनया यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनोळखी भाग, रात्रीचा प्रवास करताना मनात असलेली भीती या सर्वावर मात करत विनया यांनी हे अंतर पार केलं. महिला ही बरंच काही साध्य करू शकतात, त्यामुळं बाहेर पडा... स्वप्न पहा असं आवाहन विनया करतात.

पुरुषांचा रेकॉर्ड मोडीत 

विनया यांनी लेह ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटरचं अंतर ९८ तासात पूर्ण केलंय. त्याला महत्त्व आहे कारण पुरुष गटात हेच अंतर ९६ तासांत पूर्ण झालंय. विनया यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालंय एवढ्या पुरतंच त्यांचा हा प्रवास महत्वाचा आहे असं नाही.. तर त्यांच्या या धाडसामुळं अनेकांना प्रेरणा मिळणार हे ही तितकंच खरं...!