रणसंग्राम : ७० बोगस मतदारांना शिवसैनिकांनी दिलं पकडून

महानगरपालिकेसाठी नवी मुंबई आणि औरंगाबाद शहरात मतदानाला सुरूवात झाली आहे, नवी मुंबईत १११ जागांसाठी मतदान होत आहे, तर औरंगाबादेत ११३ जागांसाठी मतदान सुरू झालंय.

Updated: Apr 23, 2015, 09:57 AM IST
रणसंग्राम : ७० बोगस मतदारांना शिवसैनिकांनी दिलं पकडून  title=

दुपारी २.५५ वाजता
नवी मुंबई : 'आम्हाला ७० जणांना ६ गाड्यांमधून एका कॉन्ट्रॅक्टरनं घड्याळाला मत देण्यासाठी आणलं होतं...' - बोगस मतदारानं दिली कॅमेऱ्यासमोर कबुली 

दुपारी २.५० वाजता
नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा पद्धतीनं बोगस मतदान त्यांनी सुरू केलंय - खासदार राजन विचारे यांचा आरोप

दुपारी २.४० वाजता
नवी मुंबई : नेरुळमधील कुकशेत गावा इथल्या प्रभाग क्रमांक ८५ मध्ये ७० जणांनी बोगस वोटिंग केल्याचं उघड झालंय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यातील काही जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. 

दुपारी २.३० वाजता
औरंगाबाद : दुपारी २.०० वाजेपर्यंत ३२ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

दुपार १२.०० वाजता
औरंगाबाद : सकाळी ११.३० पर्यंत जवळपास २६ ते २७ टक्के मतदानाची नोंद
नवी मुंबई : उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी मतदारांची संख्या रोडावली

दुपार ११.०० वाजता
औरंगाबाद : सकाळी ९.३० पर्यंत १३ टक्के मतदानाची नोंद
औरंगाबाद : मतदान शांततेत सुरू आहे.  मुस्लीम  समाज  प्राबल्य  असलेल्या रोषण गेट परिसरात रांगा लागल्यात... महत्त्वाचं म्हणजे, मतदारांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.  

सकाळी १०.०० वाजता
औरंगाबाद : बायजीपूरा भागात मतदान केंद्रवर दगड फेक... दोन जण किरकोळ जखमी... पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मतदान सुरू 

सकाळी ९.०० वाजता
औरंगाबाद : एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा हक्क 
औरंगाबाद : महापालिका निवडणुकांत पैशांचा गैरवापर झाल्याचा इम्तियाज जलील यांचा दावा... निवडणूक  आयोगाकडे दाद मागणार असल्याचं केलं स्पष्ट 

सकाळी ८.१० वाजता
नवी मुंबई : भाजपा आमदार मंदा म्हात्रे यानी बजावला मतदानाचा हक्क, बेलापूर

सकाळी ८.०० वाजता
औरंगाबाद :  सकाळी  सकाळी  मतदान  रांगा  लागल्या आहेत.
नवी मुंबई : मतदानाला सुरुवात

नवी मुंबई : महानगरपालिकेसाठी नवी मुंबई आणि औरंगाबाद शहरात मतदानाला सुरूवात झाली आहे, नवी मुंबईत १११ जागांसाठी मतदान होत आहे, तर औरंगाबादेत ११३ जागांसाठी मतदान सुरू झालंय.

सकाळी ७.३० ते संध्याकाळी पाचपर्यंत मतदान सुरु राहणार असून त्यासाठी प्रशासनानंही जय्यत तयारी केलीय. नवी मुंबई महापालिकेत १११ वॉर्डांसाठी मतदान होत आहे. 

७७४ मतदान केंद्रावर ५६८ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल ४४६४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीय. 

तर औरंगाबादमध्ये ११३ वार्डांसाठी ही निवडणूक होणारेय. त्यासाठी ९०७ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाचे ४ हजारहून अधिक कर्मचा-यांवर काम सोपवलंय. तर ५ हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.