निवडणूक निकालानंतर केडीएमसीवासियांना बॅड़ न्यूज

कल्याण डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागताच राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली वासियांना मोठा झटका दिला आहे. आता दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

Updated: Nov 2, 2015, 05:52 PM IST
निवडणूक निकालानंतर केडीएमसीवासियांना बॅड़ न्यूज title=

कल्याण : कल्याण डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागताच राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली वासियांना मोठा झटका दिला आहे. आता दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

राज्य शासनाने उल्हास नदी पाणी नियोजनाचा आढावा घेतला. धरणामधील पाणी साठ्यात 30 टक्के तूट असल्याने 15 जुलै 2016 पर्यंत पाणी बचत होण्याच्या दृष्टीने आठवड्यातून दोन दिवस 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि दर शनिवारी बद राहणार आहे. 

तसेच महापालिका क्षेत्रातील 27 गावांत गुरूवार आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरण्याचे आव्हान महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.