जळगाव : काल परवापर्यंत पाणीटंचाईच संकट ओढवेल की काय?, अशी भीती असलेल्या जळगाव जिल्ह्याची चिंता आता मिटलेली आहे. नागरिकांना वर्षभराहून अधिक काळ पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आलाय.
हतनूर तसच वाघुर हे मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत तर दहा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरलीत. यामुळे पिण्यासह शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याबाबत जिल्ह्यात सध्या आबादानी आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिक तसच शेतकऱ्यांसाठी सुखकारक बातमी अशी की, गेली दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघुर तसच हतनूर हे मोठे प्रकल्प १०० टक्के भरलंय, तर गिरणा प्रकल्पात ४३ टक्के पाणीसाठा साचलाय, १६ पैकी १३ मध्यम प्रकल्पातही १०० टक्के पाणीसाठा साचलाय. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे.
धरणे आणि त्यातील पाणीसाठा
मोठे प्रकल्प : हतनूर आणि वाघुर १०० % टक्के
मध्यम प्रकल्प : तोंडापूर, अग्नावती, अभोरा, हिवरा, मंगरूळ, बोरी, बहुळा, अंजनी, सुकी आणि मोर १००% टक्के
पाणीसाठा जरी मुबलक असला, तरी भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी पाण्याची बचत करणे विसरता कामा नये.
चिंता गिरणा डॅमची
पिण्याच्या पाण्यासाठी असलेली धरणं भरली असली तरी, गिरणा धरणाची आणखी पातळी वाढावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कारण गिरणा धरणाचं पाणी शेतीसाठी उपयुक्त आहे. गिरणा धरणाचा कॅचमेट एरिया मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.