लातूर : उन्हाळा संपण्याआधीच मराठवाड्यातील धरणं रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या धऱणांमध्ये अवघे 2 टक्के म्हणजे 190 दलघमी इतकाच जलसाठा आता उरलाय. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे.
नांदेड, औरंगाबाद आणि परभणी वगळता उर्वरीत पाचही जिल्ह्यांमधील लघू प्रकल्पांमध्ये १ टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा उरला आहे. हा साठाही जास्तीत जास्त पंधरा दिवस पुरेल अशी अवस्था असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस आता मराठवाड्याची परीक्षा पाहणाराच असणार आहे. यावर्षीचा पाणीसाठा 2 टक्के आहे, गेल्यावर्षी या महिन्यात हा पाणीसाठा 10 टक्के होता तर 2014 ला 27 टक्क्यांवर हा पाणीसाठा होता.