'व्हॉटस अॅप' घेतंय तलाठी आप्पांची हजेरी

 गावात अनके तलाठी असे असतात, की ते कधीही चावडी किंवा तलाठी कार्यालयावर हजर नसतात. सरकारी कामकाजासाठी शेतकऱ्यांना लागणारा शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखला, बँकेसाठी लागणारी कर्जाची सातबारावरील नोंद, खातेउतारा अशा अनेक गोष्टींसाठी शेतकरी हैराण असतात.

Updated: Nov 11, 2014, 01:03 PM IST
'व्हॉटस अॅप' घेतंय तलाठी आप्पांची हजेरी title=

जालना गावात अनके तलाठी असे असतात, की ते कधीही चावडी किंवा तलाठी कार्यालयावर हजर नसतात. सरकारी कामकाजासाठी शेतकऱ्यांना लागणारा शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखला, बँकेसाठी लागणारी कर्जाची सातबारावरील नोंद, खातेउतारा अशा अनेक गोष्टींसाठी शेतकरी हैराण असतात.

तलाठी आप्पा मात्र आज तहसिलदारांसोबत मिटिंग आहे, प्रांत साहेबांसोबत मिटिंग आहे, जिल्हाधिकारी साहेबांचा तालुक्यावर दौरा आहे,  शनिवारी काही येत नाही आता थेट सोमवारीच येतो, अशी कारणं तलाठीकडून सुरू असतात. तलाठी आप्पांची ही दांडीयात्रा थांबवण्यासाठी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या तहसिलदारांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे, यासाठी त्यांनी व्हॉटसअॅपचा वापर केलाय.
 
तहसिलदार अभय चव्हाण यांनी व्हॉटस अॅपवर तुम्ही कुठे आहात, याचा सेल्फी पाठवण्याच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत. तसेच हा फोटो पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखादा तलाठी दांडी मारून जुने फोटो लावून सांगू शकतो की मी हजर आहे, पण लोकेशन या पर्याय देखिल अभय चव्हाण यांनी बंधनकारक केला आहे. यामुळे तलाठी कोणत्या भागात फिरतोय, हे दिसणार आहे. दांडीबहाद्दर तलाठ्यांना आता हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे मात्र शेतीत काम करून थकलेल्या शेतकऱ्याला सरकारी कामापासून दिलासा मिळणार आहे.

फेसबुकवरही होऊ शकते हजेरी?
गावातल्या काही तरूणांनी आपल्या गावाचं पेज फेसबुकवर बनवल्यानंतर, त्या पेजवर काय पोस्ट होतंय, त्याची जबाबदारी चार-पाच तरूणांनी घ्यावी, त्यांना अॅडमिन बनवण्यात यावं, यानंतर पाच जणापैकी एकाने दिवसभरातून एक चक्कर तलाठी कार्यालयाकडे टाकावी.

तलाठी आप्पा हजर आहेत का ते पाहावं, हजर असतील, बाजूला गावकरी, कोतवाल बसलेले असतील, कुलूप असेल किंवा नसेल, जी स्थिती तलाठी कार्यालयाची आहे, त्या स्थितीचा फोटो तुमच्या गावच्या फेसबुक पेजवर टाका, तलाठ्याच्या एकूण दांड्या वाढत असतील, तर तहसिलदार, प्रांत आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना लेखी तक्रार पाठवा, हे केलं तर आप्पा नक्की गावाला आपला चेहरा दाखवतील आणि शेतकऱ्यांची कामं होतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.