कल्याण : दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.
ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 29 च्या डायघरमध्ये शिवसेना आणि मनसे पक्षाकडून महिलांनाच उमेदवारी देण्यात आलीये... शिवसेनेकडून कीर्ती पाटील यांना २९ 'क'मधून तर शगुफ्ता वली शेख यांना २९ 'ब'मधून अधिकृत उमेदवारी दिलीये.
कीर्ती पाटील या या बी.कॉम असून त्यांचे वडील गोविंद चौधरी यांच्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला... गावातल्या समस्या सोडवण्यासाठी आणि मुस्लिम समाजातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शगुफ्ता वली शेख आग्रही आहेत.
शिवसेनेच्या य़ा उमेदवारांना टक्कर देण्यासाठी मनसेनं बीई कॉम्प्युटर झालेल्या शितल पाटील यांना २९ कमधून उमेदवारी दिलीय. शीतल पाटील यांनी याआधी अपक्ष निवडणूक लढवली होती... त्यावेळी त्यांना 1200 मतं मिळाली होती... तर २८ क मधून मनसेच्या दुसऱ्या उमेदवार नयना गायकर यांनी आपल्या विभागात महिला बचत गट सुरू करुन समाजउपयोगी कामं केल्याचा दावा केलाय.
आता दिव्यामधल्या या भागात या सगळ्या महिला उमेदवारांपैकी नक्की कोण उजेड पाडणार आणि दिव्यातल्या समस्या सोडवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे