...तर त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही - मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून देशभरात भारत माता की जय बोलण्यावरुन वाद सुरु आहे. या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतलीये. 

Updated: Apr 3, 2016, 08:15 AM IST
...तर त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही - मुख्यमंत्री title=

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून देशभरात भारत माता की जय बोलण्यावरुन वाद सुरु आहे. या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतलीये. 

जे भारत माता की जय म्हणणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही असा थेट इशाराच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. नाशिकमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

असे विधान करुन त्यांनी एमआयएमवर नाव न घेता हल्लाबोल केलाय. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी माझ्या गळ्यावर चाकू लावला तरी भारत माता की जय म्हणणार नाही असे विधान केले होते. त्यानंतर सर्वत्र यावरुन वादंग सुरु आहे.