पतीच्या सततच्या व्हॉट्सअॅप वापरामुळे पत्नीची आत्महत्या

दिवसेंदिवस सोशल मीडियाची वाढती क्रेझ अनेक समस्यांना निमंत्रण ठरु लागलीये. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सक्रिय राहण्याचे प्रमाण अधिकच वाढत चाललेय. हल्ली जो तो बघावं तेव्हा व्हॉट्सअॅपवरवर चॅटिंगमध्ये बिझी असतो. 

Updated: Jan 28, 2016, 11:09 AM IST
पतीच्या सततच्या व्हॉट्सअॅप वापरामुळे पत्नीची आत्महत्या title=

अमरावती : दिवसेंदिवस सोशल मीडियाची वाढती क्रेझ अनेक समस्यांना निमंत्रण ठरु लागलीये. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सक्रिय राहण्याचे प्रमाण अधिकच वाढत चाललेय. हल्ली जो तो बघावं तेव्हा व्हॉट्सअॅपवरवर चॅटिंगमध्ये बिझी असतो. 

व्हॉट्सअॅपच्या याच वेडापायी एका तरुणीला जीव गमवावा लागलाय. पतीच्या व्हॉट्सअॅपच्या वेडापायी एका नवविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडलीये. पूनम असं या तरुणीचं नाव आहे. याच महिन्यातील पहिल्या आठवड्यात पूनमचे लग्न अभिजीत त्रिवेदी याच्याशी झाले होते. 

मात्र अभिजीत सतत सोशल मीडियावर व्यस्त असे. रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग, मित्रांबरोबर वारंवार फिरायला जाणे या गोष्टी पूनमला खटकत होत्या. यातून त्यांच्यात वादही झाले मात्र अभिजीतची सवय काही सुटत नव्हती. 

बुधवारी सकाळीही या दाम्पत्यांमध्ये वाद झाला. मात्र या वादानंतर दुपारच्या सुमारास पूनम हिने गळफास लावून आत्महत्या केली.