नवी मुंबईत महिलेला विवस्त्र करून मारहाण

 तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करीत आहे, या महिलेने परधर्मातील मुलाशी लग्न केल्याने तिला मारहाण होत असल्याचे या महिलेने पोलिसांत तक्रार करताना सांगितले.

Updated: Jul 1, 2014, 09:09 PM IST
नवी मुंबईत महिलेला विवस्त्र करून मारहाण  title=

नवी मुंबई :  तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला शेजारचा गुंड दिवसाआड विवस्त्र करून मारहाण करीत आहे, या महिलेने परधर्मातील मुलाशी लग्न केल्याने तिला मारहाण होत असल्याचे या महिलेने पोलिसांत तक्रार करताना सांगितले.

एका महिलेने दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न केल्यामुळे तिला विवस्त्र करून तिचे नातेवाईक तिला मारत असल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला मारहाण केल्यानंतर तिच्या नवऱ्याला देखील बेदम मारहाण केली. यामुळे त्याला पालिकेच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते .  

या पीडित महिलेची तक्रार घेण्यास पोलीस तयार नव्हते, मारहाण करणारे हा गुंड असून गुड्डू शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या बरोबर आणखी पाच जण मारहाण करीत असल्याचे तक्रार ही महिलेने पोलीस ठाण्यात वारंवार केली, तरी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. परंतु, तिच्या नवऱ्याला मारहाण केल्यानंतर ही तक्रार घेण्यात आली, याबाबत आता भाजप या महिलेच्या बरोबर रस्त्यावर उतरली असून ,या महिलेची कैफियत घेऊन पोलीस आयुक्तांना भेट दिली . 

याबाबत पोलीस आयुक्तांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले. लवकरच या प्रकरणाची चोकशी करून कारवाई करू असे आदेश दिले . 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.