नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप वापरते म्हणून विवाहितेचा छळ

सर्वत्र सोशल मीडिया आणि व्हॉट्स ऍपचा जागर केला जात असताना नाशिकमध्ये मात्र व्हॉट्स ऍपचा उपयोग करणा-या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जातोय. 

Updated: Feb 9, 2016, 08:54 PM IST
नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप वापरते म्हणून विवाहितेचा छळ title=

नाशिक : सर्वत्र सोशल मीडिया आणि व्हॉट्स ऍपचा जागर केला जात असताना नाशिकमध्ये मात्र व्हॉट्स ऍपचा उपयोग करणा-या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जातोय. 

नवा मोबाईल घ्यायचा नाही, व्हॉट्स ऍपचा वापर करायचा नाही असा दम सासरच्या मंडळींकडून भरण्य़ात आला. त्याचबरोबर घरच्या बांधकामासाठी दहा लाख रूपयांचं कर्ज काढ किंवा माहेरून पैसे आणण्याची सासरच्या मंडळींकडून मागणी केली जात होती. 

ही मागणी पूर्ण न करू शकल्याने महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या प्रकरणी विवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.