मद्यधुंद क्रुझर चालकाने केला दुचाकींचा चुराडा

येथील शारदा चौकात एका मद्यधुंद क्रुझर चालकाने भरधाव गाडी चालवीत रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दुचाकींचा चुराडा केला. 

Updated: Apr 23, 2016, 07:49 PM IST
मद्यधुंद क्रुझर चालकाने केला दुचाकींचा चुराडा title=

यवतमाळ : येथील शारदा चौकात एका मद्यधुंद क्रुझर चालकाने भरधाव गाडी चालवीत रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दुचाकींचा चुराडा केला. 

मद्यधुंद चालक क्रुझर गाडी घेऊन सुसाट वेगात पांढरकवडा मार्गावरून बसस्थानकाकडे जात असतांना हा अपघात घडला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. चालक दारूच्या इतक्या नशेत होता की त्याला स्वतःचे नाव देखील सांगता येत नव्हते. 

दरम्यान गाड्यांना धडक देणाऱ्या क्रुझर चालकाला थांबवून लोकांनी त्याला बेदम चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित झाल्यानं या मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती.