मुंबई : दारू पिऊन एस टी चालक ड्रायव्हिंग सीटवर बसला तर एस टी चालूच होणार नाही, असे यंत्र एसटीमध्ये बसवले जाणार आहे.
मुंबईत रस्ता सुरक्षा कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि अधिकारी उपस्थित होते.
पुण्यातील काही तरुणांनी हे यंत्र बनवल आहे.अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष देण्यास सांगितलं जात आहे. एसटीनंतर खासगी वाहनांनाही ही यंत्रणा सक्तीची करण्यात येणार आहे.
रस्ता अपघाताबाबत सुरक्षा घेण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.