आ गया है देखो 'बॉडीगार्ड' !

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.

Updated: Jan 25, 2012, 10:34 PM IST

हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक  आहे.

एखाद्या व्यक्तीला संरक्षण देणं हे बॉडीगार्डचं काम असतं. मात्र आता हेच बॉडीगार्ड महापालिकेच्या आखाड्यात उतरत आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बॉडीगार्डंना ट्रेन करणारा अमित साखरकर उमरखाडीच्या वॉर्ड क्रमांक २२१ मधून शिवसनेच्या तिकीटासाठी इच्छुक आहे.

शिवसेनेच्या सामाजिक कार्यात सक्रीय असल्यामुळे उमेदवारी मागितल्याचा दावा बॉडीगार्ड अमित साखरकरन केला आहे. अमित हा ‘महाराष्ट्र श्री’ आहे. तर त्यांचा भाऊ आशिष साखरकर ‘मिस्टर युनिव्हर्रस सिलव्हर मेडल’ आहे.या मास्टर बॉडीगार्डची पालिका निवडूकीत खरी कसोटी लागणार आहे.