उद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?

महापालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

Updated: Feb 15, 2012, 02:41 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

उद्धव ठाकरे- अस्तित्वाची लढाई

- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार असलेल्या उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अस्तित्वाची लढाई

- मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे १६ वर्षे राज्य

- छायाचित्रणाचा छंद मनापासून जोपासणाऱ्या उद्धव ठाकरेंची या विषयावरची दोन पुस्तके प्रकाशीत

- सुरवातीच्या काळात पडदयामागचे सूत्रधार असलेले उद्धव ठाकरेंची २००२ साली शिवसेनेचे कार्याध्यक्षपदी नेमणूक

- २००२ आणि २००७ साली शिवसेनेच्या यशाचे मुख्य श्रेय उद्धव ठाकरेंकडेच जाते

- शांत, शालीन आणि संयत व्यक्तीमत्व असलेले उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उग्र प्रकृतीशी आणि आक्रमक शैलीच्या अगदी विरुध्द टोक

- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कडवे आव्हान एक बाजूला तर दुसऱीकडे राज ठाकरेंच्या मनसेच्या झंझावाताशी सामना

- मुंबई महापालिकेवर ताबा ठेवण्यासाठी राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष

 

उद्धव ठाकरेंची निवडणुकीची रणनिती

- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी रामदार आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाशी हातमिळवणी

- निवडणूक प्रचार मोहिमेत महापालिकेने केलेल्या विकास कामांना ठळक प्रसिध्दी

निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देताना बंडखोरी आटोक्यात ठेवण्यात यश

उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिके घेणं टाळत राज ठाकरेंवर मात्र कडाडून हल्ला

 

 

राज ठाकरे- नेतृत्वाची सत्वपरीक्षा

- राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करतानाच आपले काका बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निश्चय

- सोमवारी काका आणि पूतणे यांच्यातील प्रचारयुद्धात राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना मात दिल्याची चर्चा

- बाळासाहेब ठाकरेंची भाषण शैली, अंदाज, आक्रमता याची हुबेहुब प्रतिकृती असल्याने युवावर्गाला आकृष्ट करण्यात यश

- मुंबई आणि ठाण्यात मनसेला जास्तीजास्त जागा मिळवत स्वत:चे स्थान बळकट करण्याचे आव्हान

- महापालिका निवडणुकीत अपयश पदरी आल्यास राज ठाकरेना कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्याची कसरत करावी लागेल

- मुंबई शिवसेनेचे शक्तीस्थान असल्याने मनसेला सेनेची ताकद खच्ची करण्याची नामी संधी साधावी लागेल

निवडणूक रणनिती

- आक्रमक वक्तृत्वशैलीने काकांपेक्षा पूतण्या सवाई असल्याचं सिध्द

- मुंबईकर मराठी माणसाला भावनिक आवाहन करण्याची असाधारण क्षमता

- उत्तर भारतीयांविरोधात मोहिम तूर्तास स्थगित

- निवडणुकीत मराठी माणसालाच उमेदवारी

- नागरी प्रश्न, विकास कामातील भ्रष्टाचारावर प्रचाराचं लक्ष केंद्रित

- नवीन पक्ष असल्याने कोरी पाटी आणि त्यामुळेच सर्व पक्षांना टार्गेट करणं शक्य

- नवीन पक्ष असल्याने मतदारांना संधी देऊन बघा हे पटवण्यात यश

 

अजित पवार- एकच लक्ष्य मुख्यमंत्रिपद

- २००४ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असताना मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला तेव्हा काकांनी चूक केली असं मत

- जे घडलं त्यात बदल करता येणं शक्य नाही त्यामुळेच आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांवर लक्ष