www.24taas.com, मुंबई
महापालिका निवडणुकीत ठाकरे कुटुंबातली पुढची पिढी राजकारणार हिरीरीनं उतरली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. रोड शोच्या माध्यमातून आदित्य ठाकरे महायुतीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. युवा सेनेची फळीच आदित्य यांच्या बरोबर प्रचारात उतरली आहे.
दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमितही पहिल्यांदाच महापालिकेच्या रणमैदानात उतरले आहेत. मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या रोड शोमध्ये अमित सहभागी झाले होते. त्यामुळं एकंदरीत ठाकरे कुटुंबातल्या पुढच्या पिढ्याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सोलापूरात शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारासाठी हजेरी लावली. यावेळी झालेल्या महारॅलीला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आदित्य यांनी काल पुण्यात रोड शो घेतले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी सोलापूरात प्रचार केला. त्यामुळं मुंबई बाहेर प्रचाराची धुरा आदित्य सांभाळत आहेत. राज ठाकरेंचा मुलगा अमितबाबत विचारलं असताना काहीही बोलण्यास आदित्य ठाकरेंनी नकार दिला.
[jwplayer mediaid="42779"]