'राज सर' घेणार ठाण्यात मुलाखती

मुंबईसह ठाण्यातही निवडणुकीची धूम सुरु झाली आहे. मनसेनं पालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर आता इच्छुक उमेदवारांना राज ठाकरे यांच्या मुलाखतीला सामोर जावं लागणार आहे आणि इच्छूक उमेदवारही त्याची जोरदार तयारी करत आहेत.

Updated: Jan 17, 2012, 11:36 AM IST

कपिल राऊत, www.24taas.com,ठाणे

 

मुंबईसह ठाण्यातही निवडणुकीची धूम सुरु झाली आहे. मनसेनं पालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर आता इच्छुक उमेदवारांना राज ठाकरे यांच्या मुलाखतीला सामोर जावं लागणार आहे आणि इच्छूक उमेदवारही त्याची जोरदार तयारी करत आहेत.

 

सर्वच शहरात निवडणूकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष आपआपल्या पद्धतीनं निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. मनसेही त्यात मागे नाही. त्यामुळे मनसेनं घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर आता उमेदवारांना मुलाखतीचे वेध लागले आहेत.

 

खुद्द राज सर स्वत: या ४१० इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे या उमेदवारांवर दडपण असलं तरी ही मुलाखत घेणं योग्य असल्याचं मत इच्छुक उमेदवारांनी म्हटलं आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात या मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या मुलाखतीत कोण अव्वल ठरतं आणि कोण बाजी मारतं हे पहाणं महत्वाचं ठरेल.

[jwplayer mediaid="30376"]