रोग बरा करणारा 'पाणीवाला बाबा' पोलिसांच्या जाळ्यात

मंतरलेल्या पाण्यानं आजार दूर करतो असं सांगणाऱ्या एका भोंदूबाबाला नवी मुंबईतील पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Dec 18, 2014, 12:41 PM IST
रोग बरा करणारा 'पाणीवाला बाबा' पोलिसांच्या जाळ्यात title=

मुंबई : मंतरलेल्या पाण्यानं आजार दूर करतो असं सांगणाऱ्या एका भोंदूबाबाला नवी मुंबईतील पोलिसांनी अटक केली आहे.
राधेकृष्णाजी महाराज असं या बाबाचं नाव आहे.  मंतरलेल्या पाण्यानं आजार बरे करतो, अस सांगत तो नागरीकांना आपल्या जाळ्यात आणायचा. विशेष म्हणजे केवळ तीनवेळा पाणी पिऊन मधुमेह, पक्षघात यांसारखे आजार बरे करतो असं हा बाबा सांगतो. त्यामुळं याच्याकडे त्याच्या भाविकांची गर्दीच होत असे.
 
वाशी इथल्या एपीएमसी मार्केटमध्ये सुविधागृह इमारतीजवळ 'रोगमुक्त हो सभी, बाबा का संकल्प यही'चा जल्लोष करत हे नि:शुल्क शिबीर भरविलं होतं. पाणीवाला बाबाच्या शिबीरासाठी एपीएमसी प्रशासनानं परवानगी रद्द केली होती. तरीही ते शिबिर तिथं झालं.

याचा गंभीर आढावा पोलिसांनी घेतला, विनापरवाना शिबीर आयोजित केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.