मुंबई : मुंबईत आता तुम्हाला टॅक्सी बोलवायची असेल तर टॅक्सीला हात दाखवून बोलावण्याची गरज नाही. कारण टॅक्सी युनियन आता काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठीही '9211' हे मोबाईल अॅप घेऊन आलीये.
ओला, उबर, टॅब कॅब यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आणि काळासोबत बदलण्यासाठी टॅक्सी युनियनने हा निर्णय घेतलाय. अॅंड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करता येईल.
मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या सुमारे ३५,००० टॅक्सी या माध्यमातून जोडल्या जातील. पहिल्या दीड किलोमीटरला किमान २२ रुपये या दरानुसारच ही सुविधा पुरवली जाईल. सुरुवातीस रोख रकमेच्या माध्यमातून पैसे आकारले जातील. पण, भविष्यात मात्र ऑनलाईन पैसे स्वीकारण्याची व्यवस्थाही करण्यात येईल.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणेद्वारे टॅक्सीला ट्रक करण्याचेही फिचर यात आहे.