डोंबिवली : डोंबिवलीजवळ ठाकूर्ली इथे एक तरूण लोकल मधून पडल्याची घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली...मात्र कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात हा तरूण दीड तास उपचाराअभावी पडून होता.
दरम्यान, त्याला तब्बल दिड तासानंतर काळवा रूग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथंही त्यांच्यावर उपचार होऊ शकले नसल्यानं त्याला रात्री उशीरा सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकल अपघातांच्या घटना वारंवार घडत असून, याकडे आता गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.