www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्कवर सभेला परवानगी मिळावी यासाठी मनसेने न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क सायलन्स झोन म्हणून प्रतिबंधित भाग असल्याने तिथे राजकीय प्रचार सभा घेण्यास बंदी आहे. या बंदीच्या विरोधात मनसेने न्यायालयात दाद मागितली आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी प्रचार सभा घेता यावी यासाठी मनसेचा प्रयत्न आहे.
मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मिळावं यासाठी मनसेनं हायकोर्टात धाव घेतली आहे....
12 आणि 13 फेब्रुवारीला सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसेनं केलेला अर्ज महापालिकेनं फेटाळलाय. त्यामुळे मनसेनं हायकोर्टात धाव घेतलीय. आता या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
सायलेन्स झोन असल्यानं शिवाजी पार्कवर सभा घेण्यास मनाई आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कोर्टानं दोनदा परवानगी दिली होती आणि त्यासाठी आवाजाची मर्यादा घातली होती. आता मनसेनं निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
[jwplayer mediaid="30888"]