अभिनेत्री मिनाक्षीचं कापलेलं ते 'शीर' कुठं गेलं?

डेहराडूनहून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेल्या मीनाक्षी थापा या अभिनेत्रीची तिच्याच सहकलाकार मित्र-मैत्रिणीने खंडणीसाठी हत्या केली. हत्या करताना शीर धडावेगळे केले.

Updated: Jul 17, 2012, 12:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
डेहराडूनहून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आलेल्या मीनाक्षी थापा या अभिनेत्रीची तिच्याच सहकलाकार मित्र-मैत्रिणीने खंडणीसाठी हत्या केली. हत्या करताना शीर धडावेगळे केले. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांना मीनाक्षीचे धड मिळाले परंतु शीर प्रयत्न करूनही हाती लागले नाही. अमितकुमार, सुरेंद्र कुमार जैस्वाल ऊर्फ लाले (३०) व अल्विना ऊर्फ प्रीती नवीन सुरीन (२५) हे प्रेमी युगूल भोजपुरी तसेच हिंदी चित्रपटांत छोटे-मोठे साईड रोल करायचे. याचवेळी डेहराडूनहून हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आलेली मीनाक्षी थापा या वीस वर्षीय अतिशय देखण्या मुलीबरोबर त्यांची फिल्म इण्डस्ट्रीत ओळख झाली.

 

टापटीप कपडे व राहणीमान पाहून मीनाक्षी ही कुणीतरी श्रीमंत घरातील मुलगी असल्याचा या कर्जबाजारी युगुलाला भास झाला. अमित व प्रीती या दोघांनी ओशिवरा येथे भाड्याच्या घरात राहणार्‍या मीनाक्षीचे अपहरण करून तिच्या आई-वडिलांकडे खंडणी मागायचा प्लान केला. अलाहाबादला शूटिंगला जायचे आहे असे सांगून अमित व प्रीतीने मीनाक्षीला १३ मार्च २०१२ रोजी कुर्ला येथून गोरखपूर ट्रेनमध्ये बसविले. अलाहाबाद येथे उतरून तिघेजण प्रीतीच्या वडिलांच्या घरी गेले. तेथे घरात कुणी नसताना अमितने प्रीतीच्या दुपट्याने पाठीमागून जोराने गळा आवळला. तर प्रीतीने मीनाक्षीचे धडपडणारे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले. केवळ पाचच मिनिटांत मीनाक्षीने दम तोडला. गप्पा मारता मारता प्रीती आपला गळा आवळेल असे तिच्या स्वप्नातही कधी वाटले नसेल.

 

मुंबई पोलिसांना अभिनेत्री मिनाक्षी थापाचं शीर कापलंले मृतदेह सापडला होता, अलहाबादमधून अभिनेत्री मिनाक्षीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. मुंबई पोलिसांची टीम या हत्येतील आरोपी अमित जायस्वाल आणि प्रिती सरीनला घेऊन अलाहबादला पोहचली होती. अलाहाबाद पोलीस अधिक्षक शैलेश यादव यांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांनी मिनाक्षीचं शीर कापलेला मृतदेह तिच्या घराजवळील सेफ्टी टँकमधून ताब्यात घेतला होता. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी मिनाक्षीच कापलेलं शीर अलाहाबाद – जौनपूर मार्गावर चालत्या बसमधून फेकून दिलं होतं. आता पोलीस त्या जागेचा शोध घेत होते.

 

या हत्याकांडाबाबत आणखी पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींना घेऊन अलाहाबादला गेले होते. या आरोपींनी मुंबईहून अलाहाबादला जाऊन हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी खंडणीच्या हेतूने अपहरण केले होते. प्रिती आणि अमित यांना वाटले की, मिनाक्षी नेपाळ मधील एखाद्या श्रीमंत घरातील असल्याने तिचे अपहरण करून मोठी खंडणी उकळता येईल. अमित आणि प्रिती मिनाक्षीला भोजपूरी सिनेमात काम देण्याच्या निमित्ताने अलाहाबादला आणले. आणि त्यानंतर तिचा खून केला.