झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबईत गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रकार सतत घडत आहेत. आता कांदिवली भागातील १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी माता होणार असल्याचे कालच उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोण दोषी आहे याची पोलीस चौकशी करत आहे.
मुंबईत १५ वर्षांची मुलगी माता झाल्याचं आढळून आल्यानंतर अल्पवयीन मातांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. १५ ते १९ वयोगटातील महिला तसचं मुलींमध्ये माता होण्याचं प्रमाण अधिक आहे. अलपवयीन मातांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल झी रिसर्च ग्रुपनं तयार केलेला रिपोर्टनुसार देशात अल्पवयीन मातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
अल्पवयीन मातांचे देशात एकूण १६ टक्के इतकं हे प्रमाण आहे. ग्रामीण भागात ही आकडेवारी १९.१ टक्के तर शहरी भागात अल्पवयीन मातांचं प्रमाण ८.७ टक्के इतकं आहे. अल्पवयीन माताचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये झारखंड क्रमांक एकवर आहे.