कमिशनमध्ये वाढ केली जात नसल्याच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरपासून सीएनजी वितरण केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतलाय. या संपाअंतर्गत मुंबई, ठाणे आणि रायगडमधील १२२ सीएनजी केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या आठ वर्षात सीएनजी वितरकांना कमिशनमध्ये केवळ एकदाच १४ पैशांची वाढ मिळालेली आहे. सध्या दर किलोमागे २ रूपये ५० पैसे कमिशनमधून मिळतात, त्यात ८७ पैसे कमिशन वाढवण्याची वितरकांची मागणी आहे. वीज, कामगारांचे पगार, गणवेश याचा खर्च वितरकांना करावा लागतो. आतापर्यंत कमिशनबाबत केलेली मागणी मान्य न झाल्यामुळेच संपाचं हत्यार उपासावं लागत असल्याचं पेट्रोल डिलर्स असोसिएशनचं म्हणणं आहे.