www.24taas.com, मुंबई
ग्लोबल कोकण महोत्सवाच्या रुपानं मुंबईकरांना एक अनोखी मेजवानी मिळाली. कोकणची संस्कृती, तिथले चवदार पदार्थ, गाणी, नृत्य. अशा विविधांगी गोष्टींचं कोकणी रुप याची देही याची डोळा पाहण्यासाठी गेली पाच दिवस मुंबईकरांनी गर्दी केली होती. काल या महोत्सवाचा समारोप झाला. मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसांबरोबरच इतरही लोकांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला.
सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही महोत्सवाला आवर्जून भेट दिली. यात अप्सरा सोनाली कुलकर्णी, यतीन कार्येकर आदी कलाकारांनी या कोकणी महोत्सवात मनसोक्त फेरफटका मारला. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात कोकणचं नैसर्गिक सौंदर्य नागरिकांना भुरळ घालतं. मात्र गेल्या काही काळात कोकणात रासायनिक कारखान्यांची संख्या वाढल्यानं कोकणचा निसर्ग संकटात आला आहे.
मात्र आता एकही रासायनिक कारखाना कोकणात येऊ देणार नाही, असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं आहे. ज्यांचं रायगड, रत्नागिरी किंवा तळकोकणात सेकंड होमचं स्वप्न असणाऱ्यांनी ग्लोबल कोकण फेस्टीव्हलमध्ये भेट दिली.