जयराज फाटक, रामानंद तिवारी सीबीआयच्या ताब्यात

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींना चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.

Updated: Apr 3, 2012, 02:18 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींना चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.

 

गेल्या महिन्यात सीबीआयने निवृत्त मेजर जनरल ए.आर.कुमार, निवृत्त मेजर जनरल टी.के.कौल, आयएएस अधिकारी प्रदीप व्यास, माजी काँग्रेस आमदार कन्हैय्यालाल गिडवानी, निवृत्त डिफेन्स इस्टेट ऑफिस आर.सी.ठाकूर, निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छु आणि माजी डेप्युटी सेक्रेटरी नगर विकास पी.व्ही.देशमुखांना अटक केली आहे.

 

दरम्यान आदर्श घोटाळ्यातले आरोपी असलेले मुंबईचे तत्कालिन आयुक्त जयराज फाटक आणि काल सीबीआयनं अटक केलेले वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांना निलंबित केल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली.

 

 

IT, ED आणि सीबीआयनं आज कोर्टात माहिती सादर केली. प्रदीप व्यास यांना सीबीआयनं कालच अटक केली. मात्र उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून निलंबित झालेल्या जयराज फाटकांना मात्र अद्याप अटक झालेली नाही. सीबीआयच्या या अटकसत्रावर हायकोर्टानं समाधान व्यक्त केलं असून तपास योग्य वळणावर असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

 

व्यास राज्य सरकारच्या वित्त विभागात सचिवपदावर कार्यरत होते. तर फाटक यांची मागील वर्षी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य- सचिवपदी नियुक्ती झाली होती.  काल व्यास यांच्यासह निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमारे, टी. के. कौल यांनादेखील अटक झाली होती. आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना सीबीआयनं अटक केली. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास आणि लष्करी अधिकारी टी. के. कौल यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास आणि निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार या दोघांना सीबीआयनं हैदराबादहून मुंबईला आणलंय. ए. आर कुमार यांना त्यांच्या हैदराबादच्या घरातून अटक करण्यात आलीए. ए. आर कुमार,  टी. के. कौल, प्रदीप व्यास तसंच गिडवाणी यांना  कोर्टात  हजर करण्यात येणार आहे.