www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर एण्डोस्कोपी करण्याची गरज नसल्याचं लीलावतीच्या हॉस्पिटलकडून हे स्पष्ट करण्यात आलयं. बाळासाहेबांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी हे स्पष्ट केलयं.
बाळासाहेबांना संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी बाळासाहेब मातोश्रीवर जातील हे जवळपास निश्चित झालयं. बाळासाहेबांवर हैदाराबादच्या डॉक्टर नागेश्वर रेड्डी य़ांच्याकडून एण्डोस्कोपी करण्यात येणार होती. त्यासाठी डॉक्टर मुंबईतही आले होते.
एण्डोस्कोपी करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असताना बाळासाहेबांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी एण्डोस्कोपीची गरज नसल्याचं सांगितलयं. तत्पूर्वी उद्धव ठाकरे हे देखील आज लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी बाळासाहेबांची विचारपूस केली. श्वसनाचा त्रास झाल्यानं 24जुलैपासून मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतायेत.