पत्नीला धडा शिकविण्यासाठी मुलाचे अपहरण

पत्नीला धडा शिकवण्यासाठी आपल्याचा मुलाच्या अपहरणाचा बनाव नरेशच्या अंगलट आला. त्यामुळं त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.

Updated: Feb 22, 2012, 01:10 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

पत्नीला धडा शिकवण्यासाठी आपल्याचा मुलाच्या अपहरणाचा बनाव नरेश इंगलेच्या अंगलट आला. त्यामुळं त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागलीय.

 

 

तीन वर्षाच्या कल्पकला दोन महिन्यांनंतर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यात आलं. कल्पकचे वडिल नरेश यांच्या सांगण्यानुसार २५ डिसेंबरला काही लोकांनी त्यांच्या मुलाचं अपहण केलं. अपहरण कर्ते कल्पकच्या सुटकेसाठी पाच लाख रुपये खंडणी मागतं होते. कल्पकच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केल्यावर मालाडमध्ये नाजिया शेख या महिलेच्या घरी कल्पक सापडला. त्यावेळी चौकशी केल्यावर मग धक्कादायक गोष्ट पुढं आली. कल्पच्या वडिलांनीच आपल्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला होता.

 

 

आपल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी नरेशनच मुलाच्या अपहणाचा बनवा रचून आपली पहिली पत्नी नाजिया शेखच्या घरी त्याला ठेवले होते. पोलिसांनी नरेश आणि नाजिया यांना अपहरण प्रकरणी अटक केलीय.  २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आलीय.