परेराला कळलं की कानून के हाथ लंबे होते है

एलिस्टर परेरानं अखेर कोर्टात शरणागती पत्करली आहे. सुप्रीम कोर्टानं एलिस्टर परेराला हिट एण्ड रनच्या गुन्ह्यात जामीन फेटाळत तीन वर्षाची शिक्षा कायम ठेवली होती.

Updated: Jan 16, 2012, 04:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

एलिस्टर परेरानं अखेर कोर्टात शरणागती पत्करली आहे. सुप्रीम कोर्टानं एलिस्टर परेराला हिट एण्ड रनच्या गुन्ह्यात जामीन फेटाळत तीन वर्षाची शिक्षा कायम ठेवली होती. 12 नोव्हेंबर 2006 ला  बांद्र्याच्या कार्टर रोडवर एलिस्टर परेराने  सात मजूरांना कारने चिरडत पळ काढला होता. या अपघातात इतर सात मजूरही गंभीर जखमी झाले होते.

 

याप्रकरणी सेशन कोर्टाने  सहा महिन्याची शिक्षा ठोठावत मजूराना पाच लाख भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यावर एलीस्टरने मुंबई हायकोर्टात पुन्हा शिक्षेला आव्हान दिल होतं. मुंबई हायकोर्टात पुन्हा या केसची सुनावणी करत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. या निर्णयाला  परेराने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टाने परेरावर कडक शब्दात ताशेरे ओढत जामीन फेटाळून तीन वर्षांसाठी तुरूंगात पाठवलय. त्यानंतर एलिस्टर परेरानं आज शिवडी कोर्टात शरणागती पत्करली.