फक्त अकरा जणांसाठी, लाखोंना धरलं वेठीला...

पश्चिम रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. प्रवाशांना वेठीस धरून मोटरमेन आपल्या मागण्या पूर्ण करू पाहत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मात्र फार हाल होत आहेत. प. रेल्वचे अधिकारी मनविंदर सिंग यांची मनमानी सुरू असल्याचे मोटरमेनचे म्हणणे आहे.

Updated: Jul 20, 2012, 06:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

पश्चिम रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. प्रवाशांना वेठीस धरून मोटरमेन आपल्या मागण्या पूर्ण करू पाहत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मात्र फार हाल होत आहेत. प. रेल्वचे अधिकारी मनविंदर सिंग यांची मनमानी सुरू असल्याचे मोटरमेनचे म्हणणे आहे. ११ मोटरमेनवर परीक्षेत अन्याय करण्यात आल्याने जवजवळ २०० मोटरमेन एकाच वेळी संपावर गेले आहेत.

 

मनविंदर सिंग मोटरमेनना त्रास देत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. मोटरमेनला साप्ताहिक सुट्टी द्यावी असे मोटरमेनचं म्हणणं आहे. मोटरमेनच्या अनेक मागण्या पूर्ण होत नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे समजते. मोटरमेनच्या परीक्षेत ११ जणांवर अन्याय केला गेला. आणि परीक्षेत दोन जणांवर मेहरबानी करण्यात आल्याने मोटरमेनचा संतापाचा उद्रेक झाला. परीक्षेबद्दल तक्रार करुनही प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याने हा संप करण्यात आल्याचे वृत्त समजते. साप्ताहिक सुट्टी द्यावी, सहाय्यक मोटरमन द्यावा, अशा वारंवार मागण्या करुनही दुर्लक्ष होत आहे. आणि त्यामुळेच पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमेनने हा संप केल्याचे समजते.

 

तर दुसरीकडे प. रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल सुरु आहेत. रिक्षा आणि टँक्सीचालक मनमानी करीत आहेत. अव्वाचा सव्वा पैसे हे प्रवाशांकडून आकारले जात आहेत. रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मनमानी सुरूच आहे. अडलेल्या प्रवाशांकडून जादा पैशांची मागणी केली जात आहे.