माथाडींच्या घराचा प्रश्न: विरोधकांचा गोंधळ

माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

Updated: Jul 10, 2012, 01:50 PM IST

www.24taas.com, मुंबई  

माथाडी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरुन मंगळवारी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. घराबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, अशी मागणी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी केली. या प्रश्नावरुन विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

दुसरीकडे आजच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळं आजसुद्धा अधिवेशनात आगडोंब उसळण्याचीच चिन्ह आहेत. त्याचबरोबर काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे पडसादही आज अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मंत्रालयाच्या आगीचा मुद्दा उपस्थित केला होता. घोटाळ्यांच्या फाइली जाळण्यासाठीच सरकारनेच ही आग लावल्याचं खळबळजनक आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. आज या मुद्यावर विरोधक पुन्हा आक्रमक होताना दिसतील.